Fellow story – Kunal Mahurakar
Fellow story – Kunal Mahurakar

Fellow story – Kunal Mahurakar

मी कुणाल माहूरकर, Learning Companions Fellowship २०२०-२२ कोहोर्ट चा फेलो आहे. फेलोशिप नंतर मी सोनखांब सेंटर ला सेंटर लीड म्हणून जॉईन झालो. सध्या मी सोनखांब सेंटर ला २ ते ५ वयोगटातील मुलांना शिकवतो आणि एकूण सेंटर च्या जबाबदाऱ्या सांभाळतो. 
माझ्या आयुष्याचा बहुतांश वेळ हा मला आवडत नसलेल्या कामात गेला. मला कित्तेकदा वाटायचे कि स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करूया. पण आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी हे स्वप्न पुर्ण करू शकलो नाही. घरी नेहमी नोकरीबाबत टोमणे खावे लागत होते. त्याला कंटाळून मी एक नोकरी शोधली व तिथे काही महिने काम करत राहलो. मला सतत ९ ते ५ या वेळेच्या चक्रात आपण आता फसलोय असं जाणवायचं. त्यावेळी नागपूरमध्ये नुकतीच  कोरोनाची सुरुवात झाल्याने वाहतूक सेवा पूर्ण बंद झाली होती. त्यामुळे मी पूर्ण वेळ नागपूरला ताईकडे राहिलो. नोकरीला रोज ये-जा करून मी कंटाळून गेलो होतो. त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय कोणाला न सांगता घेतला. त्यादिवशी मी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं. आता पुढे काय, हा विचार मला खूप सतावत होता. मी एक अशी कामाची जागा शोधात होतो, जिथे मला माझ्या मतानुसार आवडीचं काम करायला मिळेल. त्या दरम्यान मला ताईने Learning Companions Fellowship बद्दल माहिती दिली. सुरवातीला मला याबद्दल काही कल्पना नव्हती पण इथे काम करणाऱ्या बाकी मित्रांची कामं बघून मला हे काम आपलंस वाटू लागलं. आणि पुढे मी हेच काम करणार अशी इच्छा व्यक्त केली. 
दोन वर्षाच्या फेलोशिपमध्ये येणाऱ्या प्रत्येक क्षणी मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.लहान मुलांना खेळण्याच्या माध्यमातून शिकविणे, मुले त्यामधून काय शिकले ते बघणे हा माझ्या learning चा महत्वाचा भाग आहे. कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेणे, त्याची मालकी स्वीकारणे, आणि आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे, ही सर्वात मोठी fellowship प्रवासातील माझी learning आहे.
मी काम करत असलेल्या सोनखांब सेंटर मधील प्राथमिक गटातील सर्व ८-९ मुलं वाचायला आणि लिहायला शिकली आहेत आणि नियमितपणे डायरी लेखन करतात, जिथे २०१९ साली आम्ही आमच्या कामाची सुरुवात केली तेव्हा पूर्ण समूहात कोणीही वाचता लिहिता येणारे नव्हते. मला स्वतःला फेलोशिप प्रवासाच्या शेवटी सेंटर लीड म्हणून कामाची संधी मिळाली. शिवाय आता कुठेही मी एक चांगला पूर्व-प्राथमिक गटाचा शिक्षक म्हणून काम करू शकतो हा आत्मविश्वास आला आहे.

या वर्षी फेलोशिपचा भाग होण्यासाठी आजच रजिस्टर करा आणि आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम page ला subscribe करा! लवकरच तुम्हाला पुढील तपशील आमच्या page वर मिळतील!

https://forms.gle/NGhn7Enw8XvEPVyd7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *