मी पायल गहाणे. मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील रत्नापूर गावातील असून, माझं पदव्युत्तर शिक्षण MSc. Zoology या विषयात झालेलं आहे. मी Learning Companions Fellowship २०२२ -२४ Cohort ची fellow आहे. सध्या ठणठण या सेंटरला पूर्व प्राथमिक गट म्हणजेच ३ ते ५ वयोगटातील मुलांना शिकवते.
Learning Companions Fellowship मध्ये येण्याअगोदर माझं आयुष्य जरा वेगळचं होतं. माझ्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाले होते. सोबतच माझी दोन वर्षाची लहान मुलगी होती. त्यामुळे तिला सांभाळायला घरीच राहावे लागत होते. मुलीचा सांभाळ करत मी घराजवळच्या लहान मुलांचे tution classes घेत होती. माझ्या भावाला सामाजिक क्षेत्रात काम करताना पाहून तसेच त्याची समाजबद्दलची, मुलांच्या शिक्षणाबद्दलची तळमळ बघून मला सुद्धा लहान मुलांच्या आणि महिलांच्या शिक्षणासाठी काम करण्याची आवड निर्माण झाली. मागील वर्षी मला Learning Companions Fellowship बद्दल सोशल मिडीयाच्या माध्यमातून समजले. त्यानंतर मी Fellowship ची पूर्ण माहिती काढली आणि apply केले. Fellowship च्या संपूर्ण निवड प्रकियेत दोन ते तीन महिने गेले आणि शेवटी जून महिन्यात माझी fellowship ला निवड झाली, तेव्हा मला खूप आनंद झाला.
Learning Companions Fellowship जॉईन केल्यानंतर माझ्यात खूप बदल मला होताना दिसत आहे. मी आधी कुणासमोरही व्यक्त होऊ शकत नव्हते किंवा बोलू शकत नव्हते. या fellowship च्या प्रवासात मला स्वतःला ओळखण्याची संधी मिळाली. नवीन समुदायासोबत काम करण्याची संधी मला मिळत आहे. एखाद्या नवीन समुदायासोबत सोबत काम करताना काय अडचणी येतात, कुठल्या समस्या असतात, मुलांना चांगले आणि उपयोगी शिक्षण का मिळत नाही , समुदायात महिलांच्या काय समस्या असू शकतात, अश्या अनेक प्रश्नांचे उत्तर मला समुदायासोबत प्रत्यक्ष पूर्णवेळ राहून समजत आहे. समुदायासोबत काम करताना त्यांची भाषा, संस्कृतीचा आदर करत, आलेल्या समस्यांना कसे सामोरे जायला हवे याचे जिवंत उदाहरण Learning Companions Fellowship मधून मला दिसते आहे.
या वर्षी फेलोशिप चा भाग होण्यासाठी आजच रजिस्टर करा आणि आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम page ला subscribe करा! लवकरच तुम्हाला पुढील तपशील आमच्या page वर मिळतील!
Good 😇
It’s very nice👍 work