मी प्रतीक्षा पखाले. मुळची वाशिम जिल्ह्यातील आहे. माझं पव्द्युत्तर शिक्षण MSW मध्ये झालेले आहे. मी Learning companions Fellowship 2023-25 कोहोर्ट ची fellow आहे. सध्या बोथली सेंटरला ६ ते १२ वयोगटातील मुलांना शिकविते.
मुलांना शिकवण्याची आवड सुरुवातीपासूनच होती. त्यामुळे मुलांसोबत काम करायचं मनात ठरविले होते. कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणामुळे मी घरीच ट्युशन घेत होती ,परंतु त्या कामातून मला समाधान मिळत नव्हतं. घराच्या बाहेर पडून हे काम करायची इच्छा मनात होती. MSW च्या शेवटच्या वर्षी कॉलेजच्या ग्रुपद्वारे Learning Companions Fellowship बद्दल माहिती मिळाली. मुलांना शिकवणे आणि स्वतः शिकणे यासाठी एक जागा मिळाली असं वाटलं आणि मी फेलोशिप चा फॉर्म भरून टाकला.
बोथली सेंटर Learning Companions चे सहावे, नवीन सेंटर आहे. तिथे माझी निवड झाली. सेंटर नवीन आणि माझा प्रवास देखील नवीनच होता. सुरवातीला सेट व्हायला मला त्रास गेला परंतु नंतर लक्षात आले कि हे सगळं मुलांच्या शिक्षणासाठी खूप छोटीशी गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मला मुलांना शिकवायला मज्जा येऊ लागली.
मुलांना शिकवने, स्वतः एक शिक्षक म्हणून पुढे येणे, शिक्षक म्हणून काम करणे हा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी सुखद होता. पण इथे आल्यानंतर फक्त एक शिक्षक म्हणून नाही, तर एक कम्युनिटी वर्कर, लीडर, facilitator अशा अनेक रोल मध्ये मी स्वतःला बघते आहे.
समुदायांमध्ये प्रोग्राम अरेंज करणे ,स्वतःसाठी व मुलांसाठी डॉक्युमेंट्स बनवणे, communication, presentation इ. अशी अनेक कौशल्य मी शिकत आहे. मला फेलोशिप ला जॉईन होऊन फक्त सातच महिने झाले आहेत. परंतु एवढ्या छोट्या प्रवासात अनेक कौशल्य आज मी आत्मसात केली आहेत. या प्रवासात अनेक छोट्या-मोठ्या अडचणी मला येत होत्या आणि समोर पण येणारचं. परंतु,‘अडचणी शिवाय शिकायला आणि शिकवायला मज्जा नाही’ हे वाक्य मला रोज प्रोत्साहन देते.
माझा प्रवास इथेच थांबलेला नाही. मला माझ्या मुलांचा आणि सोबतच माझा विकास करायचा आहे. अनेक कौशल्य आत्मसात करायचे आहेत जे येणाऱ्या माझ्या भविष्याला उज्वल बनवतील. मला विश्वास आहे की Learning companions Fellowship चा प्रवास मला येणाऱ्या भविष्यासाठी तयार करेल.
Learning Companions Fellowship 2024 साठी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे.
आजच apply करा!
नोंदणी फॉर्म :
https://forms.gle/fQvPs3jzLiuyc4bW6
अर्ज करण्यासाठी फॉर्म – https://forms.gle/Gn8q3Me2u1PoSK5Y6