मी आदित्य कोल्हे, मूळचा वर्धा जिल्ह्यातील. माझं पदव्यूत्तर शिक्षण MSW मध्ये झाले आहे. मी Learning Companions Fellowship 2023-2025 cohort चा fellow आहे. सध्या आसोला या सेंटरला प्राथमिक गट म्हणजेच ६ ते १२ या वयोगटातील मुलांना शिकवत आहे.
MSW नंतर एक वर्ष आरोग्य क्षेत्रात काम केले. तिथे काम करत असताना काम करायची प्रेरणा मला मिळत नव्हती. ते काम जवळचे वाटत नव्हते. फील्ड चा पाहिजे तास अनुभव मिळत नव्हता. नंतर अचानक मी काम करत असलेल्या संस्थेचे काम बंद पडले. पण स्वतःचे कौशल्य, आवड काय आहे ही समज अजूनही विकसित झाली नव्हती. तेव्हा कॉलेज व्हाट्सअँप ग्रुप मधून learning companion संस्थेबद्दल महिती मिळाली. सोबतच एक दोन मित्र- मैत्रिणी तिथे फेलोशिप करत होते. संस्थेच्या कामाच्या story मित्राकडून ऐकायला मिळत होते. त्यांच्या मधील फेलोशिपमुळे आलेला बदल मला स्पष्ट दिसायला. त्यामुळे मी देखील फेलोशिप करायचा निर्णय घेतला. माझ्या साठी शिक्षण क्षेत्रात काम करणे पूर्णतः नविन होते. परंतु स्वतःची कौशल्ये विकसित करायचे आहे हे मनात पक्के होते. Learning companion Fellowship मध्ये निवड होण्याअगोदर मला खूप प्रश्न पडले होते. मुलांना मी शिकवू शकणार काय? मला शिकवता येणार काय? वर्ग सांभाळता येणार काय? अशा एक ना अनेक प्रश्नाचा गोंधळ मनात उडत होता. परंतु नंतर फेलोशिप निवड प्रक्रियेमध्ये सामील झाल्यानंतर मला तो आत्मविश्वास येत गेला. मी एका महिन्याच्या कार्यशाळेचा भाग झालो. आणि तिथून मला पडत आसलेल्या प्रश्नाच्या उत्तरांना सकारात्मक रूप आले.बेड्याची संस्कृती, मुले , शिक्षण काय असत याचा अभ्यास व कल्पना मिळत गेली. त्या वातावरणात कसे मिसळावे याची उकल झाली. मुलांसोबत कसे काम करावे. हे एका महिन्याच्या कार्यशाळेतून कळत गेले.
या सर्व प्रक्रिया पूर्ण करून माझी निवड झाली. सुरवातीला मला पडलेले प्रश्न आणि आज मुलानं सोबत काम करतो यात फरक बघतो तर खूप वेगळा अनुभव वाटतो. कारण, शिक्षणाचा आनंद घेऊन शिकणे आणि मुलांना शिकवणे या गोष्टी मी आज मज्जेत करत आहे. मुलांसोबत काम करून बालपण पुन्हा जगायला मिळत आहे. यातून मला खूप उर्जा मिळते. रोज मी काही ना काही शिकत असतो. पुस्तके वाचणे, प्रेसेंटेशन देणे, documentation करणे, टीम वर्क इ. अनेक कौशल्ये मी शिकत आहे. या फेलोशिप प्रवासात मी स्वतःला ओळखायला लागलो. मला कोणते आणि कश्या प्रकारचे काम करायला आवडत आहे याची स्पष्टता हळूहळू येत आहे.
Learning Companions Fellowship 2024 साठी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे.
आजच apply करा!
नोंदणी फॉर्म :
https://forms.gle/fQvPs3jzLiuyc4bW6
अर्ज करण्यासाठी फॉर्म – https://forms.gle/Gn8q3Me2u1PoSK5Y6