फेलोशिप बद्दल
(लर्निंग कंपॅनिअन्स फेलोशिप २०२५ -२०२७ साठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होत आहे. तुम्हाला फेलोशिप बद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास हा नोंदणी फॉर्म भरून पाठवा – फेलोशिप नोंदणी फॉर्म
मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या आजूबाजूची सध्याची शिक्षणाची स्थिती माहितच आहे. फक्त लिहिणे, वाचणे, दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन पूर्ण करणे याच्याने चांगल्या कामाच्या संधी मिळत नाहीत किंवा स्वतः काही करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान मिळत नाही. ही परिस्थिती बदलणे आज अत्यंत गरजेचे आहे.
सुदैवाने आता ही परिस्थिती बदलत आहे. कोणत्या प्रकारे शिकवल्यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लागेल, मुलांना प्रत्यक्ष जीवनात उपयोगी कौशल्ये मिळतील, वेगवेगळ्या संधींची माहिती मिळेल याविषयी खूप चांगले काम जगभरात सध्या चालू आहे. अशाच प्रकारचा एक चांगल्या शिक्षणाचा प्रयोग आम्ही नागपूर जिल्ह्यात करत आहोत. यामध्ये काम करण्यासाठी आम्हाला अशा युवांची गरज आहे ज्यांना मुलांसोबत रहायला, खेळायला, मुलांना शिकवायला आवडते. अशा युवांना प्रत्यक्ष काम करता-करता शिकणे आणि शिकवण्याच्या पद्धती विषयी उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण देऊन नागपूर जिल्ह्यात चांगल्या शिक्षणाची एक चळवळ आम्ही उभी करणार आहोत.
ही दोन वर्षाची पूर्णवेळ (full-time) काम आणि प्रशिक्षणाची संधी आहे. यामध्ये फेलोशिपच्या काळात दोन वर्ष तुम्हाला निर्वाहासाठी मानधन मिळेल आणि तुम्ही मेहनतीने तयार झालात तर पुढे शिक्षणाच्या क्षेत्रात चांगल्या कामाच्या संधी मिळतील.
महत्वाची सूचना: फेलोशिप म्हणजे मास्टर्स (M.A, M.S.W, M.Sc.) च्या पातळीची, पण त्याहून महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी असते. मागील ३ वर्षात फेलोशिप मधून पास झालेल्या 93% फेलोंना फेलोशिप संपताच पुढील करिअर च्या संधी मिळाल्या, आणि आकांक्षा फाऊंडेशन, Slam Out Loud, iTeach, अशा नामांकित संस्थांच्या माध्यमातून सुमारे ११,००० मुलांचे आयुष्य बदलण्याचे काम करत आहेत. इथे तुम्हाला शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील लीडर म्हणून कामासाठी लागणाऱ्या कौशल्यांचे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन भविष्यासाठी तयार केले जाते. फेलोशिप म्हणजे नोकरी/जॉब नाही. इथे जे मानधन मिळते तो पगार नसून, तुम्हाला हे शिक्षण घेत असताना, स्वतःच्या तयारीवर पूर्ण लक्ष देता यावे, स्वतःचे खर्च भागवता यावे यासाठी stipend आहे. त्यामुळे तुम्हाला या क्षणी तुम्ही शिकण्याच्या, स्वतःला डेव्हलप स्टेज वर आहात असे वाटत असेल तरच आणि शिकण्याच्या तयारीनेच apply करावे, नोकरीच्या शोधात असाल तर नाही. यासंबंधित काहीही प्रश्न असल्यास इथे दिलेल्या Learning Companions च्या फोनवर संपर्क साधून बोलावे.
तुम्हाला काय करायला मिळेल?
फेलोशिप च्या काळात आपल्याला मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देता यावे आणि तुमचे शिक्षक म्हणून खूप चांगले प्रशिक्षण व्हावे यासाठी तुम्हाला खालील कामे करावी लागतील. यासाठी आवश्यक कौशल्ये आणि माहिती तुम्हाला आधीच असली पाहिजे याची गरज नाही. तुम्हाला यातील प्रत्येक गोष्टीचे प्रशिक्षण आणि वेळोवेळी मदत मिळेल. फक्त तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि तयारी असणे हे सर्वात महत्वपूर्ण आहे.
- सर्व प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे, शिक्षणासाठी आवश्यक अभ्यास आणि कामे वेळेवर आणि आवडीने पूर्ण करणे
- तुम्हाला नेमून दिलेल्या वर्गाला/मुलांना वेळापत्रकाप्रमाणे नियमित शिकविणे
- मुलांच्या शिक्षणाविषयी जागृती निर्माण व्हावी आणि मुलांच्या शिक्षणातील पालकांचा सहभाग वाढावा यासाठी नियमितपणे पालकांच्या घरी भेटी देणे, गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेणे, पालकसभा घेणे
- मुलांना शिकवण्यासाठी तुम्हाला दिले गेलेल्या साधने आणि प्रशिक्षण याच्या मदतीने चांगल्या पद्धतीने वर्ग, पाठाची तयारी करणे
- सर्व कामांचे नियोजन तसेच कामाबद्दल रिपोर्टींग यासाठी आवश्यक माहिती गोळा करणे, फॉर्म भरणे, कंप्युटर वर माहिती भरणे इ.
पात्रता – तुम्हाला फेलोशिप साठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे काय असले पाहिजे
- मुलांसोबत राहण्याची आणि मुलांना शिकवण्याची आवड
- नवीन गोष्टी शिकण्याची आणि खूप जास्त मेहनत करण्याची तयारी
- प्राथमिक गटासाठी – ४ थी वर्गापर्यंतच्या मुलांना शिकवता येईल इतके भाषा आणि गणिताचे कौशल्य
- माध्यमिक गटासाठी – ५ वी ते १० वी च्या स्तराचे गणित/विज्ञान कौशल्य
- कंप्युटर वापरा बद्दल बेसिक समज किंवा शिकण्याची तयारी
- प्रशिक्षणासाठी आवश्यक तेव्हा प्रवास करणे आणि बाहेर राहण्याची तयारी
- वय मर्यादा – २० ते २७
- विवाहित युवतींना विशेष प्राधान्य – तुम्हाला तुमच्याच गावाजवळ असलेल्या एखाद्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळेल
- दोन वर्षासाठी पूर्ण वेळ (full-time) काम करण्याची तयारी
तुम्हाला फेलोशिप मध्ये सहभागी का झाले पाहिजे
- तुम्हाला मुलांना शिकवण्याची आवड असेल तर इथे तुम्हाला दोन वर्षात अतिशय उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण मिळेल
- शिक्षणासोबत तुम्हाला संवाद, नेतृत्व क्षमता, व्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित इतर कौशल्यांचे प्रशिक्षण मिळेल
- यामुळे तुम्हाला भविष्यात चांगल्या शाळा किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये चांगल्या कामाच्या संधी मिळतील किंवा तुम्ही स्वतःचे क्लास, संस्था देखील सुरु करू शकता
- प्रशिक्षण काळामध्ये तुम्हाला आपल्या अवतीभोवती काय वेगवेगळ्या संधी आहेत याची माहिती मिळेल तसेच या क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यात, राज्यात आणि देशभरात काम करणाऱ्या वेगवगळ्या संस्था आणि व्यक्तींची ओळख होईल. त्यामुळे पुढे तुम्हाला चांगले मित्र आणि कामाच्या संधी मिळतील
मानधन
रु १०,००० (८,००० मानधन + २,००० प्रवास खर्च). नागपूर किंवा इतर शहरातील काही इच्छुक फेलो निवडले गेले आणि रूम करून राहावे लागले तर त्यांना घर भाडे आणि मेहनत भत्ता म्हणून गरज आणि कार्यक्षमता यानुसार वेगळ्याने रु. २,००० मिळतील.
निवड प्रक्रिया
तुम्हाला फेलोशिप बद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास हा फॉर्म भरून पाठवा. – फेलोशिप नोंदणी फॉर्म
- निवड फेरी १ – निवड प्रक्रियेचे अर्ज लवकरच open होतील. याच पानावर संबंधित माहिती प्रकाशित करण्यात येईल.
- निवड फेरी २ – निवडक अर्जदारांच्या फोन वर मुलाखती होतील, तसेच तुमच्याबद्दल समजून घेण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न आणि कामे दिली जातील जी तुम्हाला सांगितलेल्या वेळामध्ये पूर्ण करावी लागतील.
- निवड फेरी ३ – दुसऱ्या फेरीतून निवडलेल्या अर्जदारांची दोन दिवसांची निवड कार्यशाळा होईल. यामध्ये तुम्हाला काही कामे दिली जातील. या कामांमधील तुमची कामगिरी, कौशल्य आणि आवड याच्या आधारावर अंतीम निवड होईल.
अधिक माहितीसाठी
तुम्हाला काहीही प्रश्न असतील किंवा अधिक माहिती हवी असेल तर खालील मोबाईल क्रमांकांवर फोन करू शकता. प्रशिक्षणासाठी घराबाहेर राहणे, कामाच्या जागा याबद्दल काही प्रश्न असतील तर लगेच माघार घेण्याची आवश्यकता नाही. निवड फेरी १ आणि २ पर्यंत प्रयत्न करून, योग्य ती माहिती घेऊन पुढील निर्णय घेऊ शकतो आणि त्यासाठी वेळोवेळी आवश्यक ती मदत लर्निंग कंपॅनिअन्स ची टीम करेल.
फेलोशिप बद्दल नेहमी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे इथे वाचा!
संपर्क
निखील – 9422186406; निकिता – 8767075141 (कॉल करण्याची वेळ – सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.००, सोमवार ते शनिवार)