– अस्मिता बैलमारे
कुही फाटा ही कुही तालुक्यातील साधारण १८० घरे आणि ६०० लोकसंख्येची, मुख्यतः दगडाच्या खाणी आणि इतर मजुरी करणाऱ्या गोंड, पारधी, दलित आणि इतर स्थलांतरित कुटुंबांची वस्ती आहे. पहिल्या पाच वर्गाच्या साधारण ५०-६० मुलांसाठी केवळ दोन वर्गखोल्या आणि केवळ एकच शिक्षिका ज्या सातत्याने इतर कामांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे वस्तीवरील ९२% पेक्षा जास्त मुलांचा त्यांच्या वर्गाच्या पातळीनुसार भाषा आणि गणिताचा मुलांचा झालेला नाही. इतकी दयनीय अवस्था असताना मागील १५ वर्षात पालकांचे केवळ पोटापाण्यामागील धावणे आणि शिक्षणाबद्दल जागरूकतेचा अभाव यामुळे शाळेला जाब विचारणारे कोणीही नाही. मात्र २५ जुलै २०२२ रोजी दोन महत्वाच्या घटना घडल्या. गावातील २५-३० पालक, ग्रामपंचायत सदस्य अमर दादा आणि कार्यकर्ते नीलमानी दादा हे शाळेत जाऊन तेथील मुख्याध्यापिका दीपा रंगारी यांना भेटले. त्यांनीं मॅडम च्या अडचणी समजुन घेऊन हा प्रस्ताव ग्रामपंचायत येथे मांडण्याचे ठरविले. रंगारी मॅडम ला घेऊन सुरगाव ग्रामपंचायत येथे ग्रामसभेला गेले आणि मॅडमसह शाळेची परिस्थीती, मुलांच्या शिक्षणात अडचणी, वर्गखोल्यांची कमतरता, शिक्षकांची कमतरता याविषयीं प्रस्ताव मांडण्याचे धाडस त्यांनी दाखविले. हे कसे घडले?
आमची संस्था Learning Companions मागील एक वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासन, ग्रामस्थ आणि शाळेच्या मदतीने येथील शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी यासाठी काम करत आहे. यावर्षी काही कारणांनी आम्हाला प्रत्यक्ष मुलांना शिकवण्यावर निर्बंध आले, तेव्हा आम्ही संस्थात्मक पातळीवर पालकांची जागृती आणि शाळासुधारणेसाठी मदत करण्याच्या कामांवर आमचे लक्ष वळवले. त्याअंतर्गत मुलांच्या शिक्षणाची स्थिती, त्याला जबाबदार घटक काय आहेत आणि त्यावर उपाययोजना करण्याविषयी पालकांना काय वाटते याविषयी एक व्यापक सर्वेक्षण आम्ही सुरु केले.
यामध्ये आम्ही प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक पालकांना भेटून घरात किती मुले प्राथमिक शिक्षण घेणारी आहेत, वयानुसार त्या मुलांची प्रगती होत आहे किंवा नाही याच्या चाचण्या आम्ही त्यांच्या समोर घेत होतो. तसेच, ते त्यांच्या मुलांच्या शिक्षण प्रक्रियेत किती सक्रिय आहे, शाळेत कशाप्रकारे शिकविले जाते, मुलांना लिहिता – वाचता येत का, शाळेत भेटी देतात का अशी काही मूलभूत माहिती घेत असताना असे लक्षात आले की, तेथील मुलांची शैक्षणिक परिस्थीत खूप हलाखीची आहे, मुले समोर-समोरच्या वर्गात जात आहेत पण त्यांना पायाभूत शिक्षण पुरेसं मिळालेलं नाहीये. त्यांना उजळणी येत नाही, लिहिता येतं नाही, बारखडीची ओळखं नाही,आणखीही भरपूर समस्या तिथे काम करतांना दिसून आल्या.
यावर आपण काय करायला पाहिजे विचार करतांना, आपण लोकांना शाळा नियोजन समिती (SMC), त्यातील पालकांचे अधिकार, पालक म्हणून जबाबदारी याविषयी जागृती करू शकतो असे आम्हाला वाटले आणि आमच्याकडुन जेवढे होईल एवढे तेथील लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. त्यातच एक दिवस सर्वे च्या दृष्टीने फिरत असताना आम्हाला नीलमनी वहाणे नावाचे ३८ वर्षीय एक गृहस्थ भेटले. त्यांच्या घरातली कुणीही प्राथमिक शिक्षणं घेणारे नाही. त्यांनीं आम्हाला आमचे परिचय पत्र, आम्ही कोण, कुठले आहोत याची शाहनिशा केली. तिथून आमच्या कामाला suport म्हणून एक प्रतिनिधी आम्हाला मिळाले.
आमचे survey , assessment चे काम असेच सुरु असताना आणखी काही लोकांना भेटत गेलो, आमचे म्हणणे समजावून सांगत गेलो,असे करतांना आम्हाला kuhiphata येथील ग्रामपंचायत सदस्य अमर शंभू कतोटे हे भेटले त्यांना आम्ही मुलांच्या शिक्षण तसेच शाळेच्या परिस्थिती विषयी सांगितले. त्यांनी समजुन घेतले आणि आपण मिळून काय करता येईल असे विचार आमच्याकडे मांडले.
या प्रक्रियेत काही ठाम पालक, ग्रामपंचायत येथील सदस्य अमर दादा , कार्यकर्ते निलमनी दादा असे काहीं व्यक्तिमत्व भेटले आणि आम्ही कुही फाटा वस्ती येथील सर्व नागरिकांना/पालकांना गोळा करून एक मिटिंग घ्यायची ठरली. आम्ही मिटिंग ची सर्व तयारी करून तिथे पोहचलो. मनात थोडी भिती होती. लोकं आपली कामे सोडुन येतील की नाही, ते आपले म्हणणे ऐकून घेईल ना असे प्रश्न मनात सुरू होते. आम्ही पोहचलो तिथे काही मंडळी गोळा झाली होती, अमर कटोते यांचे घरी आमचे चाय-पाणी करण्यात आले, तोपर्यंत नीलमनि दादा यांनी लोकांना गोळा केले. आमची मिटिंग सुरू झाली आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अपेक्षित नव्हती एवढी जनता इथे उपस्थित झाली. ओट्यावर बसायला जागा उरली नाही. कुणी आपल्या घराच्या अंगणात बसले होते, तर कुणी जागा मिळेल तिथून ऐकत होते आपले प्रश्न मांडत होते , विचार केला नव्हता एवढा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामध्ये आम्ही पालकांचे प्रश्न ऐकून घेतले आणि त्यांच्यासाठी शिक्षणाच्या दृष्टीने शास्वत निरंतर उपाय काय असेल यावर विचार करायला लावले. त्यातील काही मुद्दे असे की, त्यात त्यांनीच स्वतःसाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ऊभे राहणे गरजेचे आहे, शाळेची परिस्थीती समजुन ते मॅडम सोबत मिळुन, त्यांना सहकार्य करून कशाप्रकारे सुधारता येईल, SMC काय असते त्याचे कार्य आणि अधिकार यावर चर्चा करण्यात आली. त्यातच या सर्व बाबींवर चर्चा होत असताना आमच्या सामोर आणखी एक खूप आनंदाची आणि सुखद बातमी या मंडळी कडून मिळाली ती अशी की, दुसऱ्याच दिवशी गेल्या दोन आठवड्यात SMC, शाळेची परिस्थीती याविषयीं मिळालेल्या माहितीच्या आधारे २५-३० पालक, ग्रामपंचायत सदस्य अमर दादा आणि कार्यकर्ते नीलमानी दादा हे शाळेत जाऊन तेथील Head दीपा रंगारी यांना भेटले, मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने गंभीर असलेल्या परिस्थिती विषयी त्यांनी मॅडम शी सविस्तर चर्चा केली आणि पालक वर्गाने आपले प्रश्न पुढे मांडले. मॅडम ने आपल्या समस्या पालकांना सांगितल्या, त्यात शिक्षकांची कमतरता, वर्ग खोल्यांची अडचण अशा बाबी मॅडम ने उपस्थित केल्या. यात मुलांच्या शिक्षणाचे काय हा सर्वात मोठा प्रश्न पालकांचा होता. त्यांनी मॅडम च्या अडचणी समजुन घेऊन हा प्रस्ताव ग्रामपंचायत येथे मांडण्याचे ठरविले. योगायोगाने आजच ग्रामपंचायत आमसभा देखील होती. रंगारी मॅडम ला घेऊन सुरगाव ग्रामपंचायत येथे ग्रामसभेला गेले आणि मॅडमसह शाळेची परिस्थिती, मुलांच्या शिक्षणात अडचणी, वर्गखोल्यांची कमतरता, शिक्षकांची कमतरता याविषयी प्रस्ताव मांडण्याचे धाडस त्यांनी दाखविले. तसेच सर्वांनी स्वतःच्या स्वाक्षरीसह एक पत्र ग्रामपंचायत ला दिले.
खुप खुप अभिनंदन.आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षं झाली,तरी आज ही अशी परिस्थिती आहे. वंचित घटक, ग्रामीण तसेच शहरातील काबाडकष्ट करून जगणाऱ्या पालकांमध्ये आपल्या मुलामुलींच्या शिक्षणाबद्दल आज पण जागृता नाही.ही परिस्थिती बदलण्याकरिता शिक्षणाचे प्रयोजन व गरज त्यांना समजणे व समजावणे आवश्यक आहे.Learning companion अतिशय जबाबदारीने काम करत आहे,हे पाहून खुप छान वाटते.पुढील कामासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐