मी कल्याणी दडमल, मुळची चंद्रपूर जिल्ह्यातील खेमजाई या गावची आहे. मी Learning Companions Fellowship २०२१-२०२३ कोहोर्ट ची fellow आहे. स्वतःचं ध्येय आणि Intrest काय आहे, याची ओळख मला MSW चे शिक्षण घेत असतानाचं कळले. पण या वाटेवर चालण्यासाठी तसं काम मिळायला पाहिजे आणि ते काम Learning companions मध्ये मिळालं. शिक्षणासाठी आणि कामासाठी घरातून नेहमी विरोध असायचा, पण त्या विरोधाला लढण्याची क्षमता कुठून तयार झाली माहिती नाही,पण माझे निर्णय मात्र ठाम असायचे.
जेव्हा Learning Companions मध्ये आले तेव्हा शिक्षणाबद्दलची माझी व्याख्या बदलली. जे शिक्षण Learning Companions भारवाडच्या मुलांना देत आहे, ते तर आम्ही आमच्या बालपणात बघितलं देखील नाही. शिक्षकाची भिती, मार आणि सोबतच कंटाळवाने शिक्षण हे आमच्या वाटेला आलेलं. पण Learning Companions याउलट शिक्षण मुलांना देत आहे. वेगवेगळ्या activity, त्या activity ला जोडून real life lonnection, जगण्याची मज्जा, मुलांमध्ये आणि Fellow मध्ये मैत्रीचं नातं निर्माण होणं हे इथूनचं मला शिकायला मिळलं.
Fellowship ला आल्यानंतर पुस्तकापलीकडलं जग मला सापडायला लागलं. लोकं मिळत गेली त्यांचे विचार, त्यांचे काम कुठेतरी माझ्याही आयुष्याला आकार देणारे ठरले.परीक्षा पास होण्यासाठी वाचली जाणारी पुस्तके कुठेतरी बाजूला सारून समाजातील समस्या,आयुष्य जगण्याची कला, शिक्षणाबद्दलचा दुष्टिकोन, नातेसंबंध,अश्या बऱ्याच गोष्टी Fellowship मध्ये आल्यानंतर शिकले. जे काही निर्णय स्वतःच्या आयुष्याबद्दलचे किंवा समाजाबद्दलचे होते ते Fellowship मध्ये येऊन आणखी घट्ट झाले, त्याला बांधणी आणि जोडणी मिळाली. जे करतोय ते योग्य आहे याचा पुरावा fellowship मधूनचं मिळाला. कदाचित ही fellowship मिळाली नसती तर इतर मुलींसारखी मी पण घर सांभाळत बसले असते.
मला समाजाबद्दलची आवड आणि तळमळ या भरवाड मुलांना बघून मिळाली. सोबतच माझे पुढचे पाऊल कुठे असेल याची स्पष्टता मिळत आहे. इथे काम करत असताना आई-बाबाचा माझ्याबद्दल सकारात्मक दुष्टिकोन तयार झाला, ज्यामुळे मला आणखी जास्त आनंद होतोयं.
या वर्षी फेलोशिपचा भाग होण्यासाठी आजच रजिस्टर करा. आणि आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम page ला subscribe करा! लवकरच तुम्हाला पुढील तपशील आमच्या page वर मिळतील!
Very nice, proud of you kalyani