Learning Companions
Associate – Recruitment and Communications

Associate – Recruitment and Communications

जागा  – 1

कामाचे स्वरूप – पूर्ण वेळ

ठिकाण – नागपूर

Learning Companions बद्दल 

लर्निंग कंपेनियन्समध्ये आम्ही असे Education leaders तयार करण्यासाठी काम करत आहोत जे उपेक्षित समुदायातील मुलांसाठी प्रभावी आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या जागा निर्माण करण्यासाठी काम करतील. ‘लर्निंग कम्पॅनियन्स फेलोशिप’ द्वारे सुमारे 150 Education leaders तयार करून आणि शाळा, स्वयंसेवी संस्था, सरकारी किंवा खाजगी अशा विविध स्तरांवर आणखी 150 Education leaders ना प्रशिक्षण, मदत करून पुढील 10 वर्षांत विदर्भातील (महाराष्ट्र) शैक्षणिक दृश्य बदलणे हे आमचे ध्येय आहे. या चळवळीद्वारे, आम्ही सुमारे 20,000 मुलांपर्यंत पोहोचण्याचे आणि स्वतःच्या आवडी, मूल्यांबद्दल जागरूक असलेल्या आणि त्यांच्या आवडीचा पाठपुरावा करण्यास आवश्यक कौशल्ये असलेली पिढी विकसित करण्याचे आमचे ध्येय आहे.

Recruitment Associate रोल बद्दल

आम्ही Learning Companions मध्ये काम करण्यासाठी लहान मुलांसोबत काम करण्यात इंटरेस्ट असलेल्या, मेहनती, ध्येयवेड्या अशा नागपूर आणि परिसरातील युवांच्या शोधात असतो. यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालय, गावे किंवा इतर जागांना भेटी देणे, कॉलेज पदाधिकाऱ्यांशी ओळख आणि संबंध निर्माण करणे, फेलोशिप बद्दल presentation साठी परवानगी मिळवणे, social media, whatsapp च्या माध्यमातून फेलोशिप बद्दल माहिती जास्तीत जास्त युवांपर्यंत पोहोचवणे, संपर्क करणाऱ्या युवांना संस्थेबद्दल, फेलोशिप बद्दल पुरेशी माहिती देणे आणि त्यांना फेलोशिप ला apply करण्यासाठी प्रोत्साहित करणे ही महत्वाची कामे  Recruitment Associate म्हणून करावी लागतात.

जबाबदाऱ्या

  • फेलोशिप बद्दल माहिती पोहोचवण्यासाठी आवश्यक पोस्टर, सोशल मीडिया पोस्ट, भित्तीपत्रके टीम च्या मदतीने बनवणे 
  • social media, whatsapp च्या माध्यमातून फेलोशिप बद्दल माहिती जास्तीत जास्त युवांपर्यंत पोहोचवणे
  • नागपूर आणि परिसरातील कॉलेजेस ना भेटी देणे, संबंधित पदाधिकाऱ्यांना संस्था आणि फेलोशिप बद्दल माहिती देणे आणि युवांसोबत संवाद साधण्यासाठी परवानगी मिळवणे 
  • इच्छुक युवांचे कॉल घेणे, त्यांना आवश्यक ती माहिती पुरवणे 
  • फेलोशिप अर्ज आणि निवड प्रक्रियेत सर्व स्तरावर युवांशी संवाद, मदत आणि समन्वय करणे 
  • या रोल शी संबंधित इतर येतील ती कामे करणे 

अपेक्षित कौशल्ये/अनुभव

  • अनोळखी लोकांसोबत स्वतःहून पुढाकार घेऊन बोलण्याचा अनुभव किंवा ते करण्याची आणि शिकण्याची तयारी 
  • स्वतःचे दुचाकी वाहन 
  • प्रभावी संवाद कौशल्य 
  • Documentation साधने (Docs, Excel, Forms) सहजपणे हाताळता येणे, किंवा शिकण्याची तयारी
  • कोणत्याही शाखेचा पदवीधर (किंवा शिक्षण चालू असेल तरी चालेल)

इथे तुम्हाला काय मिळेल?

  • सर्जनशील (creative), नाविन्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शिस्तबद्ध कामाचा अनुभव, ज्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी बेस्ट ट्रेनिंग, नेटवर्क आणि तयारी मिळेल 
  • तरुण, समविचारी आणि धमाल टीम सोबत काम करण्याचा अनुभव
  • स्वतःहून वेगवेगळे प्रयोग करण्याला प्रोत्साहन आणि संधी

मानधन

रुपये १२,००० (रु. १०,००० basic salary + २००० रु प्रवास खर्च; यापेक्षा अधिक प्रवास खर्च आल्यास तो वेगळ्याने दिला जाईल)

निवड प्रक्रिया

पायरी 1 – जर तुम्हाला हा रोल नीट समजला असेल आणि तुम्ही अर्ज करण्यास तयार असाल, तर कृपया हा अर्ज २५ सप्टेंबर २०२४ पर्यंत सबमिट करा. आम्हाला तुम्ही दिलेल्या माहितीवर काही स्पष्टीकरण हवे असल्यास आम्ही तुम्हाला टेलिफोनिक संभाषणासाठी विनंती करू शकतो.

पायरी 2 – Pre-work – निवडक उमेदवारांना काही टास्क पूर्ण करण्यास सांगितले जाईल.

पायरी 3 – मुलाखत – निवडलेल्या उमेदवारांना अंतिम मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम उमेदवाराची निवड pre-work आणि मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारे केली जाईल.

काही प्रश्न असल्यास आम्हाला learningcompanions2021@gmail.com किंवा gsbirajdar516@gmail.com वर लिहा. किंवा पुढील मोबाईल क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा – 8767075141 (निकिता)